इंद्रधनुष्य पाहताना आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या छटांचा अनुभव येतो, त्याचप्रमाणे हे पुस्तक वाचताना चेखवच्या कथांच्या विविध रंगच्छटा अनुभवायला मिळतील!
या कथा आपल्याशी ‘स्पेस-टाईम’ ओलांडून ‘रिलेट’ करतील; आपल्याच जगण्याबद्दल आपल्याला छोट्या-मोठ्या कहाण्या सांगतील; कदाचित आपल्या नजरेतून सुटलेल्या आपल्याच दुर्गुणांवर, विसंगतींवर बोट ठेवतील; आपल्याभोवती आपण स्वत: तयार केलेले कोश दाखवतील आणि झालंच तर आपल्या आयुष्यातल्या दररोज घडणार्या सापेक्ष शोककहाण्या उलगडून दाखवतील.......